बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधमोहिम व प्रतिबंध कार्यवाहीची
जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न
लातूर दि.24 ( जिमाका ):- जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधमोहिम व प्रतिबंधासाठी येत्या 15 दिवसांच्या आत प्रत्येक तालुकानिहाय समित्या स्थापन करण्यात याव्यात. तसेच त्या-त्या तालुक्यातील समित्यांनी बोगस वैद्यक व्यावसायिकांची माहिती तयार ठेवावी. या समित्यामार्फत बोगस डॉक्टरांविरुध्द कार्यवाहीसाठी पंचनामे करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच नागरिकांनी बोगस डॉक्टरांविरुध्द माहिती प्रशासनास द्यावी, जेणे करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी निर्देश दिले.
जिल्ह्यातील बोगस वैद्यक व्यवसायिकावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची ( बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंध) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. देशमुख, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत माले, डॉ. आर्चना पंडगे, डॉ. बरुरे बी. एस. आदि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment