मनपाकडून महिला बचत गटांना ६ कोटींचे कर्ज वाटप
कर्ज वाटपात लातूर मनपाचा राज्यात दुसरा क्रमांक -महापौर विक्रांत गोजमगुंडे
लातूर/प्रतिनिधी: दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी स्वयंरोजगार या घटकामध्ये २५८ महिला बचत गटांना ५कोटी ९३ लक्ष ३९ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
लातूर शहराच्या विविध भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगारची संधी निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना केंद्रबिंदू मानून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे. चालू वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये राज्य शासनामार्फत ४७ महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्याचे उदिष्टे देण्यात आले होते. प्रत्यक्षात महानगरपालिकेने २५८ महिला बचत गटांना कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपा मध्ये लातूर महानगरपालिका राज्यात दुसरी आहे. पहिला क्रमांक नागपूर महानगरपालिकेचा आहे. याच बरोबर वैयक्तिक कर्ज प्रस्तावामध्ये ५० लाभार्थ्यांना ५६ लक्ष ६० हजार रु कर्ज वाटप करण्यात आले आहे.
२०१५- १६ यावर्षी योजना सुरु झाल्यापासून आजपर्यंत १ हजार महिला बचत गटांना १६ कोटी ७१ लाख कोटी ५ हजार रुपयेकर्ज वितरीत करण्यात आले आहे.मार्च अखेर महिला बचत गटांना कर्ज वाटपात लातूर मनपाचा राज्यात पहिला क्रमांक राहू शकतो अशी माहितीही विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
या कर्ज वाटपासाठी मनपा शहर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत तोडकर, नितीन सुरवसे, लक्ष्मण जाधव, समुदाय संघटक विरेंद्र सातपुते, श्रीमती प्रभावती पाटील परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment