मुंबई, दि. १५:- संत रविदास महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, संत रविदास हे समाज सुधारक होते. त्यांनी आपल्या काव्यातून सामाजिक विषमता, वाईट चालीरिती यावर परखड मत मांडले. त्यांनी मानवतावादाचा पुरस्कार केला. समता – बंधुता आणि एकात्मता याविषयीचे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असे आहेत.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Q6FLtKR
https://ift.tt/Ujxtz3f
No comments:
Post a Comment