6 कोटी 20 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते - latur saptrang

Breaking

Monday, March 7, 2022

6 कोटी 20 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते



 जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार जि.प. सर्कल मधील विविध गावांत ग्रामविकास विभाग अंतर्गत 6 कोटी 20 लाख रुपयांच्या विविध विकास  कामांचे भूमिपूजन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आज रविवार ( दि.6 ) रोजी संपन्न झाले. 


       या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, तालुकाप्रमुख राजेंद्र राठोड, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, कृउबा समितीचे सभापती चंद्रकांत जाधव, युवासेना तालुकाप्रमुख राजू तायडे, सरपंच शिवाजी खरात, जि.प.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, शाखा अभियंता शांतीलाल कंठाळे , नायब तहसीलदार अशोक कापसे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment