यूसुफ पठान पत्रकार मालेगाव
आज दिनांक 05/03/2022 वार शनिवार क्रांती चौक पोलीस स्टेशन अंतर्गत वरद गणपती मंदिर रोड,येथे नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली . पोलीस आयुक्त श्री डाॅ निखील गुप्ता साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व इतरही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या निगराणीत पोलीस निरीक्षक श्री डाॅ गणपत दराडे क्रांती चौक पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता बागुल मॅडम ,वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजवळ साहेब,ए.आर साळवे , कृष्णा पोटे यांचे सह मोठया प्रमाणात वाहनांची तपासणी मोहीम आज दुपारी राबविण्यात आली .मोटार - सायकल टु व्हीलर बाईक चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने , अचानक पणे शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या टाईम - नुसार नाका बंदी दरम्यान ,अनेक चोरटे पकडले जात आहेत, चेकिंग दरम्यान प्रथम संशईत व चोरीचे वाहन , फॅन्सी नंबर प्लेट,गाडी कोणाची आहे ,त्यांची तपासणी केली जात आहे ."मोटार - सायकल चोरीचे प्रमाण वाढले असले तरी चोरीच्या गाड्या डिटेक्ट करण्याचे प्रमाणही वाढले आहे,अनेक चोरट्यांना चोरीच्या गाड्या हस्तगत करुन ,अटक करुनही कारवाई करण्यात आली आहे व सुरू आहे".जनतेला , नागरिकांना त्रास देण्याचा उद्देश नाही मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नाईलाजास्तव पोलीस प्रशासनाला ,नाका - बंदी तपासणी. मोहीम हाती घ्यावी लागते आहे व गुन्हेगार ही पकडले जात आहेत
No comments:
Post a Comment