ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...! - latur saptrang

Breaking

Monday, March 7, 2022

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...!


यूसुफ पठान पत्रकार मालेगाव

 ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषदेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...!


जालना - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पूर्ववत करावे तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत या मागणीचे निवेदन जालन्याचे अप्पर जिल्हाधिकारी केशव नेटके यांना देण्यात आले. मा. सर्वोच्च न्यायालयाने विकास गवळी केस अनुषंगाने अस्तित्वात असलेले इतर मागासवर्गीय समूहासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण रद्द केले आहे. सरकारने मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता परंतु मा. न्यायालयाने हा अहवाल प्रायोगिक, अभ्यास व संशोधना शिवाय करण्यात आलेला आहे असे सांगून यामध्ये ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणारे राजकीय प्रतिनिधित्व सिद्ध होत नाही. हे कारण ठेवून अंतरिम अहवाल नाकारला गेल्यामुळे अस्तित्वात असलेले ओबीसींचे 27 टक्के राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. देशात व राज्यात 52 टक्क्या पेक्षा जास्त छोटे छोटे समूह मिळून विभागलेला ओबीसी समाज राजकीय प्रतिनिधित्वा पासून वंचित राहणार आहे त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशा प्रकारे विधेयक मान्य करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे संरक्षण करावे अशीही मागणी करण्यात आली. त्याच बरोबर मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे समता परिषदेच्या वतीने देण्यात आला. व तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित  न झाल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसी समाजाला सोबत घेऊन येणाऱ्या कुठल्याही निवडणुका होऊ देणार नाही व ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकेल अशेही निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ (आबा) वाघमारे, युवकचे डॉ. विशाल धानुरे, उपाध्यक्ष सुंदरराव कुदळे, सुधाकर घेर, शहराध्यक्ष दीपक वैद्य, शिवाजी गाडेकर, दशरथ तोंडूळे, तालुकाध्यक्ष सुनील बनकर,ज्ञानेश्वर खरात, प्रा  राजकुमार बुलबुले, एड. गायकवाड, शुभम जाधव, राजू घोडके, तुकाराम घेर, शंकर सातपुते, विजय साखरे, दत्ता पवार, शुभम खंदारे, राहुल पहाडे, सागर राऊत, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती...!!

No comments:

Post a Comment