जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन - latur saptrang

Breaking

Monday, March 7, 2022

जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन

 जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन


 


हिंगोली, (जिमाका) दि. 07 : शासकीय, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, संस्था प्राधिकरण व त्यांच्या अखत्यारित असलेल्या सर्व संस्था व इतर कार्यालय (उदा. शाळा, विद्यालय, महाविद्यालये, आरोग्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा इ. ) मध्ये दि. 8 मार्च, 2022 रोजी जागतिक महिला दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.


महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ जगभरात 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांप्रती जिव्हाळा, आदर व्यक्त करण्याबरोबरच सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात दाद मिळावी यासाठी महिला दिन साजरा करण्याचा उद्देश आहे .


हा महिला दिन कार्यक्रम साजरा करताना त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी, स्त्री-पुरुष समानता स्थापित करण्यासाठीच्या उपाययोजना, महिला भेदभाव व अत्याचार समाप्त करण्यासाठी केलेले विविध उपाय इत्यादी विषयावर भर देण्यात यावा. ज्यामुळे महिलांबद्दल असणारी प्रतिगामी मते बदलण्यामध्ये सकारात्मक बदल होतील व महिला सशक्तीकरणाच्या प्रयत्नास मदत होईल. विविध प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांविषयी विविध चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात. महिला सशक्तीकरणासाठी विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा ग्रामीण किंवा नागरी स्तरावर सत्कार आयोजित करावा. महिला दिनाचे औचित्य साधून साजरा करावयाच्या कार्यक्रमासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात व व्यापक प्रमाणात विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा, वेळापत्रक तयार करण्यात यावेत, अशा प्रकारचे विविध उपक्रम आयोजित करावेत.

No comments:

Post a Comment