UP Election Exit Polls Results 2022 : लखनौ : उत्तर प्रदेशात आज सातव्या टप्प्यातील मतदान (UP Election 2022) पार पडलं. पूर्वांचलमध्ये ५४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. याठिकाणी स्वतः पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या आहेत. तसेच समाजवादी पक्षाचं (SP) देखील इथं वर्चस्व पाहायला मिळतं. त्यामुळे हा टप्पा सर्वांसाठी महत्वाचा आहे. आज सर्वांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. त्यानंतर लगेच एक्झिट पोल (UP Election Exit Polls) आले असून त्याचे अंदाज समोर आले आहेत.
काय सांगतात एक्झिट पोल? -
उत्तर प्रदेशात रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा योगी सरकार येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपसह युतीला २५२ ते २७७ जागा
सपा आणि इतर पक्ष ११९ ते १३४ जागा
बसपा ७ ते १५ जागा
काँग्रेसला ३ ते ८ जागा
इतर पक्षांना २ ते ६ जागा
न्यूज १८ एक्झिट पोल
भाजप : 262-277
सपा : 119-134
बसपा : 7-15
काँग्रेस : 3-8
उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत १४ मे २०२२ ला संपणार आहे. त्यापूर्वीच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान घेण्यात आले. देशाच्या राजकारणाचा म्हणजेच दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असं म्हणतात. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच महत्वाची आहे. भाजप, समाजवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशच्या सत्तेसाठी प्रयत्न केले आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपमधून अनेक बड्या नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. तसेच अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे भाजपसमोर तगडे आव्हान आहे. त्यांनी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला आहे. इतर लहान पक्षांचा देखील अखिलेश यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक कठीण होती, असं बोललं जात आहे. दरम्यान, १९८५ पासून उत्तर प्रदेशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी मिळालेली नाही. जर योगी आदित्यनाथ हे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर युपीच्या राजकारणात गेल्या ३७ वर्षांचा इतिहास बदलेल.
२०१७ च्या निवडणुकीची स्थिती -
गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र लढले होते. उत्तर प्रदेशात भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. ४०३ जागांसाठी भाजपप्रणित एडीएला तब्बल ३२५ जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाच्या आघाडीला ५४ जागा, तर मायावतींच्या बसपाला १९ जागा मिळाल्या होत्या. तसेच आरएलडीला एक जागा, तर इतर पक्षांना ३ जागा मिळाल्या होत्या.
No comments:
Post a Comment