देशात सर्वात महाग CNG नागपुरात, एकाच दिवसात २० टक्क्यांनी वाढ
नागपुरात प्रतिकिलो सीनएनजीसाठी १२० रुपये किलो मोजावे लागतात. रविवारपर्यंत सीएनजीचे दर १०० रुपयांवर होते. पण, एकाच दिवसात २० टक्के वाढ झाली असून सीएनजीची किंमत १२० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सीनएजीवरील वाहनधारकांना फटका बसत आहे.
नागपुरात सीएनजी इतका महाग का? -
नागपुरात सीनएजीचा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रोमेट कंपनीचे आहेत. नागपुरात सीएनजीची पाईपलाईन नाही. त्यामुळे सरकारकडून सबसिडी मिळत नाही. गुजरातमधून एलएनजी आणावा लागतो. त्यानंतर नागपुरात सीएनजीमध्ये रुपांतर केलं जातं. त्यानंतर सीएनजी पंपावर आणून विकण्यात येतो. रशिया युक्रेनमधील युद्धामुळे एलएनजीचे दर वाढले आहेत. तसेच गुजरातमधून नागपुरात एलएनजी आणण्याचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे सीएनजीचे दर गगनाला भिडल्याचं बोललं जात आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? -
युक्रेन-रशियामधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण, आतापर्यंत भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत. निवडणुकांमुळे सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले नाहीत, असं बोललं जात आहे. पण, आता निवडणुका संपल्या असून लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, असंही सांगितलं जात आहे.
No comments:
Post a Comment