मंदिरे व श्रृध्दास्थाने ही लोककल्याणाची क्षेत्रे बनावीत-अॅड.माधवराव पाटील टाकळीकर
लातूर / प्रतिनिधी ः समाजातील मंदिरे वा सर्व प्रकारची धार्मिक श्रृध्दास्थाने ही केवळ लोककल्याणाचीच स्थळे बनावीत, ना की वादाची किंवा विध्वंसाची कारणे. जेथे माणसाचे चित्त स्थिर होऊन जनकल्याण साधण्याचे कार्यवृध्दींगत होतील ती कार्ये या ठिकाणाहून पार पडावीत अशी प्रांजळ अपेक्षा अॅड. माधवराव पाटील टाकळीकर यांनी आज हरंगुळ (बु.) येथील कैलास नगरमध्ये झालेल्या श्री शंभू महादेव देवस्थानाच्या पाया खोदणी समारंभाच्या वेळी बोलताना व्यक्त केली.
नुकतेच म्हणजे रविवार दि. 22 मे 2022 रोजी लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) च्या कैलासनगर मधील श्री शिवालय चॅरिटेबल ट्रस्टद्वारा स्थापन करण्यात आलेल्या शंभू महादेव देवस्थानाच्या महादेव मंदिराच्या पाया खोदणीचा शुभारंभ बसवेश्वर शिक्षण संस्थेचे नव नियुक्त सचिव अॅड. माधवराव पाटील टाकळीकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खटके, नामांकीत बांधकाम व्यावसायिक उमेश हंडरगुळे, प्रा. डॉ. मनोजकुमार मोटे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी मंदिरे आणि देवस्थाने ही केवळ लोककल्याणाचीच साधने व्हावीत. तसेच येथून सर्वांचे श्रृध्दास्थान असलेल्या देव, संत महात्म्यांच्या शिकवणींचा अंगिकार करुन त्यांची उपासना करणार्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात त्यांच्या आदर्श विचारांचा अंगिकार करावा आणि त्यांनी घालून दिलेल्या जणकल्याच्या मार्गावर चालावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी पुढे श्री खटके यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की, आमच्या संत महात्म्यांनी आम्हाला देश, देश आणि धर्माच्या रक्षणा बरोबरच सर्वधर्म समभावाची शिकवण दिली आहे. त्या शिकवणींवर चालताना आम्ही आमच्या संत महात्म्यांच्या आदर्शांची पावलो पावली जाणिवा व्हाव्यात यासाठी मंदिरे आणि श्रृध्दास्थाने गरजेची असल्याच त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये अॅड. माधवराव पाटील टाकळीकर यांचा सन्मान चंद्रकांत खटके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. मनोजकुमार मोटे सरांचा सत्कार उमेशजी हांडरगुळे यांच्या हस्ते तर, चंद्रकांतजी खटके यांचा सत्कार रमेशप्पा रावळे यांनी तर उमेश हंडरगुळे यांचा सत्कार उमाकांत बुधे यांनी केला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार संतोष स्वामी यांनी केले. तर सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन अजय गोवर्धन यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश कुंभार, यशवंत बुधे, बबिता देवणे, दीपा पुरी, अनिता मिटकरी, जान्हवी स्वामी, पपिता रावळे, कस्तुराबाई पोतदार आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment