दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
🚨 सोनिया गांधी यांना ED चे पुन्हा समन्स :
नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी ईडीसोमोर हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदरही सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता.
🥳 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! :
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता 1 जुलैपासून वाढण्यास येत आहे. एआईसीपीआई कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता थेट 39 टक्के होईल. रिपोर्ट्सनुसार, सरकार 1 जुलैपासून महागाई भत्त्यात (डीए हाइक) 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. वास्तविक, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे.
😷 आता सार्वजनिक ठिकाणी, गाडीत मास्क लावणं बंधनकारक :
देशात कोरोना व्हायरसचं वाढतं प्रमाण पाहता कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, पुन्हा मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणं, मॉल्स, वेटर्स, दुकानदार आणि कारमध्ये मास्क घालणं बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला.
🏥 पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक :
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्कराचे हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक आहे. मुशर्रफ व्हेंटिलेटरवर नाहीत, अशी पोस्ट त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकली आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. ते अशा कठीण स्टेजमधून जात आहेत जिथून बरे होण्याची शक्यता नाही आणि त्यांच्या सर्व अवयवांनी काम करणे बंद केले आहे. कुटुंबीयांनी लोकांना त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे.
🗣️ 'शब्द देऊन दगाबाजी झाली, त्यांची यादी आमच्याकडे' :
राज्यसभा निवडणुकीत मोठी दगाबाजी झाली आहे. शब्द देऊन ही दगाबाजी करण्यात आली आहे. या दगाबाज लोकांची यादी आमच्याकडे आहे, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दगाबाजी करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. त्याचवेळी ते म्हणाले, माझ्या पराभवाचा प्रयत्न झाला. संजय राऊत यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment