राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात - latur saptrang

Breaking

Saturday, August 6, 2022

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई, दि. 6 – राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1, रायगड-महाड- 2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात आहेत.

नांदेड- 1, गडचिरोली- 1 अशी एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)  तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  28 जिल्हे व 314 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली. 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 116 नागरिकांना आपला जीव गमावला आहे तर 231 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/fnR5lXJ
https://ift.tt/b45asHc

No comments:

Post a Comment