Pankaja Munde: आता आमच्यात नातंच उरलेलं नाही; धनंजय मुंडेंची कबुली
Dhananjay and Pankaja Munde : राज्यातील बीडच्या बहिण भावांच्या नात्याचं राजकारण देशाला माहित आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद राज्याला माहित आहे. कोणत्याना कोणत्या विषयावर दोघांमध्ये जुंपलेली पाहिला मिळत असते.
आता मात्र पंकजा मुंडे आणि बंधू धनंजय मुंडे यांच्यात भाऊ बहिनीचे नाते राहिले नसल्याचे धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. मुंडे म्हणाले आता आमच्यात बहीण-भावाचं नात उरलेले नाही. राजकारणामुळे आता आम्ही एकमेकांचे वैरी आहोत. आम्ही पूर्वी खऱ्या अर्थाने एकमेकांचे नातेवाईक होतो. पण राजकरणामुळे आमच्यात वैर निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही आता दुरावलो असून अश्या वागण्यामुळे काय परिणाम होतो. याचं, ज्याचे त्याने आत्मपरीक्षण करावे असे धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या या व्यक्तव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांनीच रक्ताचे नाते कधी संपत नाही असे सांगितले होते. मी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असून मला कुणी वैरी वाटत नाही, असे मुंडे म्हणाल्या.
No comments:
Post a Comment