राज्यातील 1 हजार 165 पैकी 72 ग्रामपंचायती बिनविरोध; बाकी ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा?
आज राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आम्हीच बाजी मारणार असा दावा सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र गुलाल कोण उधळणार हे आज समजणार आहे. दुसरीकडे आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यामध्ये ही लढत आहे. येत्या 19 ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात. राज्यात परतीचा पाऊस कोसळत आहे. हे सर्व अपडेट मिळवा एका क्लिकवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटास रायगडमध्ये धक्का
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे विजयी झाले आहेत.
नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत निकालात भाजपची सरशी; राष्ट्रवादीनं खातं खाेललं
नंदुरबार जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील दोनशे ग्रामपंचायतींसाठी नुकतेच मतदान झाले. आज प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सध्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. तिन्ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ग्रामपंचायतीचा गुलाल कोण उधळणार? ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस कोण बाजी मारणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
राज्यातील 1 हजार 165 पैकी 72 ग्रामपंचायती बिनविरोध; बाकी ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा?
राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या या निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी ताकद लावली होती. त्यातच 72 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून बाकी ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकणार हे लवकरच समोर येईल.
No comments:
Post a Comment