Andheri East Bypoll:अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार? भाजप नेत्यांची आज बैठक - latur saptrang

Breaking

Monday, October 17, 2022

Andheri East Bypoll:अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार? भाजप नेत्यांची आज बैठक

 


Andheri East Bypoll:अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेणार? भाजप नेत्यांची आज बैठक

Andheri East Bypoll: अंधेरी पोटनिवडणूक (Andheri East bypoll) बिनविरोध व्हावी यासाठीची चर्चा सुरू असताना आज मुंबईत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज 'वर्षा' बंगल्यावर बैठक होणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप उमेदवार माघार घेण्याची शक्यता असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. 

रविवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधेरीतील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीतही पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटले हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. या पोटनिवडणुकीत भाजप विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज भाजप नेत्यांच्या बैठकी पार पडणार आहेत. 

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून देखील  नाट्य घडले होते. मुंबई महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या लटके यांना राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. 

तरीही निवडणूक होणार 

भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेतली तरी अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटात मुख्य लढत आहे. या दोन मुख्य प्रतिस्पर्ध्यांशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक आहे. 

No comments:

Post a Comment