पावसाने लातूरमध्ये दाणादाण; पिकं संकटात, जनावरं दगावल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातून सर्वदूर विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यात रेणापूर, अहमदपूर, चाकुर तालुक्यात शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेलं पशुधन वीज पडून दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज कोसळताच होरपळून निघालेल्या गाय, म्हैस, अन् शेळ्यांनी तडफडून मरताना पाहण्याचं दुर्दैव काही पशुपालकांच्या नशिबी आलं. तर काही जनावरांनी वीज कोसळताच प्राण सोडला. अनेक ठिकाणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने ग्रामस्थांची अडचण झाली. त्यांच्यावर मानवी साखळी करून नदी पार करण्याची वेळ आली.
रेणापूर तालुक्यातील बीटरगाव येथे झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला. नदीच्या पुलावरून पाणी वेगात वाहत असल्याने शेतात गेलेले ग्रामस्थ नदीच्या पैल तीरी अडकून पडले. अखेर मानवी साखळी केल्याने महिला, मुलांना, तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांना सुखरूप नदी पार करता आली.
पावसात मानवी हानी झाली नसली तरी पशुधनाची हानी झाली आहे. रेणापूर तालुक्यातीलच आसराचीवाडी येथील बालाजी कोपनबैने यांच्या पाच शेळ्या वीज कोसळून दगावल्या. तर रामवाडी (ख.) येथील केशव कोळगावे या शेतकऱ्याची एक म्हैस वीज पडल्याने दगावल्याची घटना घडली. अहमदपूर तालुक्यातही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील मोहागांव येथील रहिवासी असलेल्या जयराम हनुमंत सिरसाट यांची किनगाव शिवारातील शेतात वीज पडून एक म्हैस दगावली.
चाकूर तालुक्यातील मौजे कवठाळी येथील वैजनाथ सदाशिव शेळगे यांची एक गाय वीज पडून दगावल्याची घटना घडली. जिल्ह्यात सोयाबीन पिक काढणीला आले आहे. मात्र गत काही दिवसांपासून हजेरी लावल्याने शेतशिवरात पाणी साठल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
मांजरा धरणातून कुठल्याही क्षण विसर्ग
मांजरा धरण सकाळी ६ वाजेपर्यंत ९७.१० टक्के भरले आहे. यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यासाठी दरवाजे उघडले जाऊ शकतात. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून वाहणाऱ्या तेरणा नदीवरील औरराद शाहजनी येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिसरास झालेल्या पावसाने या बंधाऱ्यात पाण्याचा येवा अद्याप सुरूच आहे. निलंगा तालुक्यातील कलमुगळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. लातूरपासून हाकेच्या अंतरावर असलेले गंगापूर गाव डीपी जळाल्याने दोन दिवसापासून अंधारात आहे. महावितरणला अर्ज करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment