Andheri ByPoll: निवडणुकीतून माघार घेण्यासाठी कुणाचा दबाव, मुरजी पटेलांनी स्पष्टच सांगितलं...
मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून (Andheri East ByPoll) भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. त्यानंतर आता भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी याप्रकरणी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच, त्यांनी ऋतुजा लटके यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन रणकंदण सुरु होतं. मात्र, यासर्वात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्राने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर आज भाजपने उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून यासंदर्भात घोषणा केली.
अपक्ष लढणार नाही - मुरजी पटेल
"मी अपक्ष लढणार नाही. मी पक्षाला माणणारा कार्यकर्ता आहे. मी अपक्ष निवडणूक लढणार नाही. मी ऋतुजा लटकेंना शुभेच्छा देतो", असंही ते म्हणाले.
निवडणुकीतून भाजपची माघार
या निवडणुकीत ऋतुजा लटके या निवडून याव्यात, त्यांच्या समर्थनार्थ आम्ही हा अर्ज मागे घेत आहोत. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीयच्या युतीचा उमेदवार असलेले मुरजी पटेल जे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार होते. त्यासाठी अर्जही भरण्यात आला होता. १५ हजार लोकांची रॅलीही आली होती, पण आज केंद्रीय आणि राज्य नेतृत्त्वाने असा निर्णय घेतला आहे की हा अर्ज मागे घेऊ, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुरजी पटेल अपक्ष लढणार नाही - बावनकुळे
मुरजी पटेल हे अपक्षही लढणार नाहीत, एकदा भाजपचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जात नाही, त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाहीत, त्यांच्यावर शंका घेण्याचं कारण नाही.
- यावर मुरजी पटेल यांना विचारलं असता ते म्हणाले, "पक्षाने जो आदेश दिला आहे तो मी पाळणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर अजिबात कोणाचा दबाव नाही. आणच्यासाठी भाजप आमची आई आहे. मरेपर्यंत पक्षासाठी काम करत राहू, पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्त्वाखाली आयुष्यभर काम करत राहू. पद असो नसो याचा काहीही फरक पडत नाही, अंधेरीच्या जनतेची सेवा आम्ही आयुष्यभर करत राहू. अंधेरीच्या जनतेने मला जी साथ दिली, ती अशीच पुढे देत राहिल. मी आधीही काम करत होतो, पुढेही करत राहिन. लोकांच्या सुख-दु:खा मी पहिले काम करायचो त्यापेक्षा ताकदीने काम करेन".
अपक्ष लढणार नाही - मुरजी पटेल
"मी अपक्ष लढणार नाही. मी पक्षाला माणणारा कार्यकर्ता आहे. मी अपक्ष निवडणूक लढणार नाही. मी ऋतुजा लटकेंना शुभेच्छा देतो", असंही ते म्हणाले.
निवडणुकीतून भाजपची माघार
या निवडणुकीत ऋतुजा लटके या निवडून याव्यात, त्यांच्या समर्थनार्थ आम्ही हा अर्ज मागे घेत आहोत. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीयच्या युतीचा उमेदवार असलेले मुरजी पटेल जे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार होते. त्यासाठी अर्जही भरण्यात आला होता. १५ हजार लोकांची रॅलीही आली होती, पण आज केंद्रीय आणि राज्य नेतृत्त्वाने असा निर्णय घेतला आहे की हा अर्ज मागे घेऊ, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुरजी पटेल अपक्ष लढणार नाही - बावनकुळे
मुरजी पटेल हे अपक्षही लढणार नाहीत, एकदा भाजपचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जात नाही, त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाहीत, त्यांच्यावर शंका घेण्याचं कारण नाही.
No comments:
Post a Comment