लातूरकरांसाठी रोटरीच्या सर्व विधायक कामांना
सर्वतोपरी सहकार्य करू
चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
रोटरीच्या समाज उपयोगी कार्याचे केले कौतुक
लातूर प्रतिनिधी १७ ऑक्टोबर २२ :
समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात रोटरीकडून होत असलेल काम अत्यंत प्रशंसनिय असून या लातूरकरांच्यासाठी रोटरीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्व विधायक कामांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या पुढाकारातून रोटरीच्या वतीने डिस्ट्रिक्ट ग्रँट मधून सावित्रीच्या लेकी प्रकल्पांतर्गत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांच्या 90 रोटरी क्लबच्या माध्यमातून मुलींना सायकल वाटप शुभारंभ चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. १६ ऑक्टोबर २२ रोजी दैनिक यशवंत भवन कार्यालय येथे करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, सौ. समृध्दी निखिल पिंगळे, डॉ. सारिका देशमुख, डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, सौ. सविता मोतीपवळे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, प्रा. बी.व्ही.मोतीपवळे, विजय राठी, हेमंत रामढवे, डॉ. संजय गवई, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. संजय पोळ, कमलेश पाटणकर, गिरीश ब्याळे, रवी जोशी, नंदकीशोर लोया, चंद्रशेखर खानापुरे, सतीष कडेल, बी.आर.पाटील, संचालक प्रवीण पाटील कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ.ओमप्रकाश मोतीपोवळे, सविता मोतीपवळे, हेमंत रामढवे, सूधीर लातूरे, लक्ष्मीकांत सोनी आदिनी केले. प्रारंभी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत सावित्रीची लेक डिस्ट्रिक्ट ग्रँट प्रकल्प अंतर्गत शालेय मुलीसाठी सायकल वाटप प्रकल्पातर्गत मुलींना देण्यात येणाऱ्या सायकलचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी रोटरीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा कौतुक केल, तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपोवळे यांच्या पुढाकारातून सावित्रीची लेक प्रकल्प अंतर्गत शालेय मुलींना देण्यात येणाऱ्या सायकल वितरण प्रकल्पाच कौतुक केल. आज सर्वजण आपापल्या क्षेत्रात विविध प्रकारे चांगल्या कामांमध्ये कार्यरत आहेत. पण रोटरी क्लबकडून मात्र सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात एका वेगळ्या आणि चांगल्या कामाची नियोजनपूर्वक उभारणी होत आहे हे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी क्लबकडून कोरोना प्रादुर्भाव काळात आधार हरवलेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पिठाची गिरणी दिली तसेच शैक्षणिक मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब भेट दिले. समाजातील शेवटचा घटक जो वाडीतांड्यावर राहतो त्यांना दीपावलीनिमित्त भेटवस्तू दिल्या हे विधायक काम अत्यंत चांगल्या पद्धतीने रोटरीन केलेला आहे असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आज सावित्रीची लेक प्रकल्प अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकल वितरित करण्यात येत आहे, ज्या विद्यार्थिनीला आवश्यक आहे त्या विद्यार्थिनींना ही सायकल मिळणार असून या सायकलचा चांगला वापर त्यांच्याकडून व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून चेअरमन वैशाली देशमुख यांनी लातूरकरांच्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्व विधायक कामांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
रोटरी क्लब उपक्रमाची स्वनिधीतून अंमलबजावणी
डॉ. ओमप्रकाश मोतीपोवळे
यावेळी रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीकडून कोरोना काळात आधार हरवलेल्या कुटुंबांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन भेट देण्यात आली, महिलांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास झाला पाहिजे यासाठी काही उपक्रम राबविले जातात तसेच हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक रुग्णांना मदत केली आहे, याशिवाय राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन या राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनेसाठी रोटरी क्लब स्वतःच्या निधीतून उपक्रमाची अंमलबजावणी करीत असल्याचे डॉ. ओमप्रकाश मोतीपोवळे यांनी सांगितले.
आपली पहिली सायकल हा
आपला खूप मोठा आनंद असतो
सौ समृद्धी निखिल पिंगळे
या कार्यक्रमात बोलतांना सौ समृद्धी निखिल पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या, आपली पहिली सायकल हा आपला खूप मोठा आनंद असतो मला पहिल्यादा सायकल मिळाली त्यांचा आनंद आजही आठवतोय. रोटरी क्लब सावित्रीच्या लेकींना सायकल मिळाल्याचा आनंद देत आहे या शिवाय शाळेला प्रवासाला जाण्याची त्यांची एक मोठी गरज भागवत आहे. यामूळे हा उपक्रम अत्यंत चांगला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक लक्ष्मीकांत सोनी यांनी केले सूत्रसंचालन डॉ. सुचित्रा भालचंद्र आणि आभार सुधीर लातूरे यांनी मानले यावेळी या कार्यक्रमास रोटरी क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment