अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार :
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेलहे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. असे असले तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.
🗣️ भाजपने माघार घेताच राज ठाकरेंकडून कौतुकाची थाप :
भाजपाने आपल्या पत्राची दखल घेत अंधेरी पूर्व् विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय परंपरेचं पालन करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपामध्ये वेगवान घडामोडी घडल्या आणि ऋतुजा लटकेंविरोधातील मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.
🤩 शेतकऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 4 हजार रुपये मिळणार :
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आज मोठी बातमी मिळणार आहे. आज पीएम मोदी 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत. हे पैसे लाभार्थ्यांना पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याच्या रूपात दिले जातील. यापूर्वी, ऑगस्ट ते नोव्हेंबर 2021 मध्ये 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता हस्तांतरित करण्यात आला होता.
💁♂️ काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू :
काँग्रेसचे नवे अध्यक्ष निवडण्यासाठी देशभरातील 9 हजारहून अधिक प्रतिनिधी मतदान करत आहे. समोरासमोरच्या लढतीत, गांधी घराण्याचे जवळचे सहकारी मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या शशी थरूर यांच्या पुढे दिसत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान शशी थरूर यांनी निवडणुकीत समान संधी न दिल्याबद्दल अनेकदा तक्रारी केल्या आहेत. बुधवारी झालेल्या मतमोजणीनंतर 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे.
🏏 सराव सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव :
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामन्यात भारताने रोमहर्षक असा 6 धावांनी विजय मिळवला. मोहम्मद शमी या विजयाचा शिल्पकार ठरला. प्रथम फलंदाची करताना भारताने 186 धावांचे आव्हान उभारले. दरम्यान केएल राहुल आणि सुर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 180 धावांपर्यंतच मजल मारता आली.
No comments:
Post a Comment