आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते लाभार्थींचा सन्मान पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे आभार - latur saptrang

Breaking

Thursday, October 7, 2021

आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते लाभार्थींचा सन्मान पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे आभार


 







              प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस लाभार्थी सन्मान दिवस म्हणून प्रदेश भाजपच्या वतीने साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने केंद्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी सन्मान करून गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे अनेक लाभार्थ्यासह स्वतः पोस्टकार्ड लिहून आभार व्यक्त केले

         प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशातील गोरगरीब सर्व सामन्‍य जनतेला दिलासा देणारे अनेक महत्‍वपुर्ण निर्णय घेतले. त्यामुळे घरकुल, शौचालय, शेतकरी सन्मान, उज्वल गॅस, आयुष्यमान भारत, कोरोना लसीकरण मोफत धान्य यासह विविध योजनेच्या माध्यमातून अनेकांना आधार मिळाला विविध योजनेच्या लाभार्थींचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड यांनी सन्मान करून या योजना गोरगरिबांसाठी सुरू केल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे अनेक लाभार्थ्यासह स्वतः पोस्टकार्ड लिहून आभार व्यक्त केले

                 रेणापुर शहरातील विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान करून आ रमेशआप्पा कराड यांनी शहरातील अनेक बुथ मधील केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन चौकशी केली. घरकुल योजनेची पाहणी केली या योजना मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी यावेळी  देशाचे पंतप्रधान मा.मोदीजी यांना आभार व्यक्त करणारे पत्र स्वतःच्या अक्षरात लिहून पाठविले. याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे मराठवाडा संपर्कप्रमुख डाँ बाबासाहेब घुले, जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, तालुका अध्यक्ष अँड दशरथ सरवदे, रेणापूर पंचायत समितीच्या सभापती बायनाबाई साळवे, माजी सभापती अनिल भिसे, रेणापूरच्या नगराध्यक्ष आरती राठोड उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता सरवदे श्रीकृष्ण पवार, नप सभापती उज्वल कांबळे नगरसेवक विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, राजू अलापुरे, रमेश चव्हाण, संतोष चव्हाण, महेश गाडे,धनंजय म्हेत्रे, बंटी शिंदे, अजिमभाई शेख यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आदीची उपस्थिती होती


 पंकजा मुंडे, विनोद तावडे, चित्रा वाघ यांना संधी
राज्य सरकारने ७२ तासांमध्ये नुकसान भरपाई न दिल्यास आम्ही शेतकरी "७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन" करू : राज्य सरकारला अल्टिमेटम !
शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यात उद्यापासून मिशन कवच कुंडल अभियान
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या ‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
असा सुसाट विकास होणे नाही ! डिझेल सुद्धा अब की बार 'शंभरी' पार
राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
 परळी नगर पालिकेवर बहुभाषिक नामफलकाचे अनावरण
घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक घेतले मुंबादेवीचे दर्शन
मा. खा.डॉ.सुनील ब गायकवाड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे चा ' जीवन गौरव ' पुरस्कार जाहीर.
123...95

No comments:

Post a Comment